श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र
२२.०७.१९२२ – २९.०९.२०१३
"अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते | तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ||"
- नाना महाराज परांजपे
परमपूज्य नाना महाराजांचा जन्म २२ जुलै १९२२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आतवणे या गावी एका मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्यांना आध्यात्मिक जीवनाची ओढ होती आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्त्वज्ञानाचा व शिकवणीचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते भारतीय सैन्यात ‘सिव्हिलियन’ म्हणून रुजू झाले आणि त्यांनी ब्रह्मदेशातील (म्यानमार) दुसऱ्या महायुद्धात सहभाग घेतला. सैन्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी अनेक वर्षे ‘हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन लिमिटेड’मध्ये ड्राफ्ट्समन म्हणून काम केले आणि १९८० मध्ये ते निवृत्त झाले. नोकरीत असतानाही ते नियमितपणे आपल्या सहकाऱ्यांसाठी प्रवचने आयोजित करत आणि आपले आध्यात्मिक अनुभव त्यांच्याशी शेअर करत असत.
प्रमुख वैशिष्ट्ये
श्री स्वामी समर्थ मठ, आपटा फाटा (श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र)
हे केवळ एक मंदिर नसून अनेक भक्तांसाठी श्रद्धेचे आणि सेवेचे एक महत्त्वाचे केंद्र आहे
आध्यात्मिक वातावरण आणि शिस्त
हा मठ निसर्गरम्य आणि शांत परिसरात असल्यामुळे भाविकांना तिथे गेल्यावर मनःशांती मिळते. मठातील दैनंदिन आरती, जप आणि नामस्मरण अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडते, ज्यामुळे सात्विक ऊर्जेचा अनुभव येतो.
अन्नदान आणि सेवा
मठाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील ‘सेवाभाव’.
अन्नदान: येथे येणाऱ्या भक्तांसाठी दर गुरुवारी दुपारी 1 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत प्रसादाची सोय असते.
या उपक्रमाद्वारे आदिवासी पाड्यांवरील गरजू लोकांना धान्य, कपडे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते.
एक हात मदतीचा
मदत कार्य
या उपक्रमाद्वारे आदिवासी पाड्यांवरील गरजू लोकांना धान्य, कपडे आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. आजूबाजूच्या गावातील शाळेतील मुलांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप तसेच मुलांसाठी सहलींचे आयोजन तसेच शाळेतील मुलांसाठी अन्नदान, आदिवासी पाड्यातील भगिनींसाठी आणि गरीब गरजू भगिनींसाठी साड्या वाटप कपडे वाटप असे उपक्रम राबवले जातात
आरोग्य शिबि
अन्नदान
ग्रामीण विकास
आदिवासी विकास
मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
रक्तदान शिबिर
मोफत अन्नदान सेवा (महाप्रसाद)
आमची साध्ये
ईश्वरकृपेने केलेली सेवा
श्रींच्या कृपेने आणि भक्तांच्या सहकार्याने मठामार्फत अन्नदान, आरोग्य शिबिरे, शैक्षणिक मदत व सामाजिक सेवा यांसारखे विविध उपक्रम यशस्वीपणे राबवता आले. ही आमची कामगिरी नसून, ही श्री स्वामी समर्थांची प्रेरणा आणि सर्व भक्तांच्या सहभागातून घडलेली सामूहिक सेवा आहे. भविष्यातही हे कार्य अधिक विस्ताराने आणि निःस्वार्थ भावनेने सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे.
छायाचित्र
इथे आम्ही करत असलेल्या उपक्रमांबद्दलचा एक छोटा व्हिडिओ आहे.
- Find us on YouTube
आपल्या सेवेचा हातभार द्या
आपल्या सहकार्यामुळे मठातील अन्नदान, आरोग्य सेवा, शैक्षणिक मदत आणि सामाजिक उपक्रम अखंडपणे सुरू राहतात. आपले प्रत्येक देणगीरूप योगदान गरजूंच्या जीवनात आशा, आधार आणि आनंद निर्माण करते. मानवसेवेत सहभागी होऊन या पवित्र कार्याचा भाग व्हा.
